Saturday, June 6, 2026
HomeBreaking newsविठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ च्या विकासासाठी स्वप्नील सुनील पडगेलवार यांचा दमदार...

विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ च्या विकासासाठी स्वप्नील सुनील पडगेलवार यांचा दमदार जनसंपर्क

विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ च्या विकासासाठी स्वप्नील सुनील पडगेलवार यांचा दमदार जनसंपर्क

चंद्रपुर महाराष्ट्र

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत

दिनांक:- ०८ जनवरी २०२६

सविस्तर बातमी:- चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये परिवर्तनाची हवा वाहू लागली आहे. या प्रभागातून युवा व विकासाभिमुख उमेदवार स्वप्नील सुनील पडगेलवार यांनी निवडणूक रिंगणात उतरताच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वप्नील सुनील पडगेलवार हे या प्रभागातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले उमेदवार असून त्यांनी नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पाणीपुरवठा सुधारणा, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, गटार व नाल्यांची नियमित स्वच्छता, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था तसेच महिला सशक्तीकरण व सांस्कृतिक विकास यासाठी त्यांनी ठोस आराखडा मांडला आहे.

प्रभागातील नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत असून, “विकासासाठी नव्या विचारांची गरज आहे” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. स्वच्छ प्रतिमा, काम करण्याची जिद्द आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका यामुळे स्वप्नील पडगेलवार यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे.

या निवडणुकीत कपाट हे निवडणूक चिन्ह घेऊन स्वप्नील सुनील पडगेलवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाले असून, नागरिकांनी प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular