Friday, June 5, 2026
HomeBreaking newsजनतेसाठी कायम उपलब्ध असलेले उमेदवार, प्रभागातील प्रत्येक समस्येच्या निराकरणात सक्रिय – भालचंद्र...

जनतेसाठी कायम उपलब्ध असलेले उमेदवार, प्रभागातील प्रत्येक समस्येच्या निराकरणात सक्रिय – भालचंद्र दानव

जनतेसाठी कायम उपलब्ध असलेले उमेदवार, प्रभागातील प्रत्येक समस्येच्या निराकरणात सक्रिय – भालचंद्र दानव
चंद्रपुर महाराष्ट्र 
 
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत 
 
दिनांक:- ५ जनवरी २०२६
 
सविस्तर बातमी:-चंद्रपूर महानगरपालिकेच्या विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 ड मधून भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार भालचंद्र दानव हे नागरिकांमध्ये सातत्याने सक्रिय दिसून येत आहेत. निवडणुकीपुरते नव्हे तर कायमस्वरूपी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते काम करत आहेत.
प्रभागातील नागरिकांच्या मते पाणीपुरवठा, वीज, रस्ते, नाल्या, स्वच्छता, पथदिवे अशा मूलभूत प्रश्नांवर भालचंद्र दानव तत्काळ लक्ष देतात. संबंधित विभागांशी संपर्क साधून समस्या मार्गी लावण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे ते संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.
स्थानिक नागरिकांचे मत आहे की जनतेशी थेट संवाद ठेवणारा आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या समस्या ऐकणारा असा उमेदवार जनतेने गमावू नये. भालचंद्र दानव यांनी राजकारणाकडे सत्तेचे साधन न मानता जनसेवेचे माध्यम म्हणून पाहिले आहे.
विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 ड साठी मतदान दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहे. नागरिकांनी विजयी बोधचिन्ह कमळासमोर बटन दाबून जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular