Friday, June 5, 2026
HomeBreaking newsविठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकासाचा विश्वास – स्वप्नील सुनील पडगेलवार...

विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकासाचा विश्वास – स्वप्नील सुनील पडगेलवार यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकासाचा विश्वास – स्वप्नील सुनील पडगेलवार यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

चंद्रपुर महाराष्ट्र 

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत 

दिनांक:- जनवरी २०२६

सविस्तर बातमी:- चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रभागातून युवा, संवेदनशील व विकासनिष्ठ उमेदवार स्वप्नील सुनील पडगेलवार यांनी निवडणूक रिंगणात उतरल्यापासून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
स्वप्नील सुनील पडगेलवार हे या प्रभागातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व असून त्यांनी नेहमीच नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि गरजा प्रत्यक्ष समजून घेतल्या आहेत. कोणताही दिखावा न करता काम करण्यावर त्यांचा भर असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ठोस आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडला आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करणे, खराब रस्त्यांचे मजबुतीकरण, गटार व नाल्यांची नियमित स्वच्छता, स्वच्छता व आरोग्य सुविधा, महिला सशक्तीकरण तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे हे त्यांच्या प्राधान्यक्रमात आहे. “प्रभागाचा विकास म्हणजे केवळ आश्वासन नाही तर सातत्याने केलेले काम” ही भूमिका त्यांनी नागरिकांसमोर स्पष्ट केली आहे.
सध्या प्रभागातील विविध भागांतून स्वप्नील पडगेलवार यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर वाढताना दिसत आहे. स्वच्छ प्रतिमा, कामाची तळमळ आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका यामुळे ते प्रभागातील आशेचा नवा चेहरा ठरत आहेत.
या निवडणुकीत कपाट हे निवडणूक चिन्ह घेऊन स्वप्नील सुनील पडगेलवार मैदानात असून, विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ च्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular