Friday, June 5, 2026
HomeBreaking newsप्रभाग क्रमांक 11 भानापेठ वॉर्डमध्ये आतिश जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस...

प्रभाग क्रमांक 11 भानापेठ वॉर्डमध्ये आतिश जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत पॅनल

प्रभाग क्रमांक 11 भानापेठ वॉर्डमध्ये आतिश जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत पॅनल

चंद्रपुर महाराष्ट्र 

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत 

दिनांक:- ०८ जनवरी २०२६

सविस्तर बातमी:-चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 भानापेठ वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे। या पॅनलमध्ये आतिश जनार्दन पाटील, अरविंद भास्कर माहुरवार आणि कु. माधुरी दीपक कटकोजेवार यांचा समावेश आहे।

या पॅनलमधील उमेदवार आतिश जनार्दन पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून वॉर्डमध्ये सातत्याने सक्रिय असून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी ओळखले जातात। रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, आरोग्य तसेच नागरी सुविधांबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ते तत्काळ उपस्थित राहून संबंधित विभागाशी समन्वय साधून काम करून घेतात।

वॉर्डमधील नागरिकांचे म्हणणे आहे की आतिश पाटील हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता वर्षभर जनतेच्या संपर्कात असतात। दिवस असो वा रात्र, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वॉर्डमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे।

पॅनलमधील इतर उमेदवार अरविंद भास्कर माहुरवार आणि कु. माधुरी दीपक कटकोजेवार हे देखील वॉर्डच्या विकासासाठी सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून काम करत आहेत। तिन्ही उमेदवार एकत्रितपणे भानापेठ वॉर्डचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत।

वॉर्डवासीयांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर मतदान करून पॅनलमधील तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे।

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular