Saturday, April 18, 2026
HomeBreaking news100 दिवस कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा - पालकमंत्री डॉ. अशोक...

100 दिवस कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके Ø व्हीसीद्वारे जिल्हा प्रशासनाचा आढावा ; पालकसचिवांची उपस्थिती चंद्रपूर, दि. 24 : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यात सुरवातीच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून मुख्यालय स्तरावर याबाबतचा आढावा नियमितपणे होणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात अग्रेसर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केल्या. दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये, शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासकीय अधिका-यांनी शासकीय दौरे करतांना त्या ठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांना भेट देणे आणि शासकीय कार्यालयात येणा-या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचे आणि फिल्ड व्हिजीटचे वेळापत्रक तयार करावे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक आहे. 15 एप्रिल 2025 च्या आत कृती आराखड्यानुसार दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल, याची दक्षता घ्यावी. यात कोणतीही हयगय होता कामा नये. शासन स्तरावर 100 दिवस कृती आराखड्याचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे, त्यामुळे अधिका-यांनी उद्दिष्ट ठेवून काम करावे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवावा. तसेच पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत ठेवावे. त्याची नियमित साफसफाई होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा इतर राज्यांना लागून असल्यामुळे अवैध वाहतूक, गो-तस्करी या बाबींना आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने कडक पाऊले उचलावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या. लोकाभिमुख होऊन काम करा – पालकसचिव संतोषकुमार राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची जिल्हा पातळीवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. शासन हे लोकाभिमुख असावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख होण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडविणे, आठवड्यातून दोन वेळा फिल्ड व्हिजीट करणे, गावात गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणे, आदी बाबी करणे आवश्यक आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात चांगले प्रशासन चालवावे. येत्या 100 दिवसात चंद्रपूर जिल्हा प्रशासन नक्कीच चांगले काम करेल, अशी अपेक्षा अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोषकुमार यांनी व्यक्त केली. जिल्हाधिका-यांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी सादरीकरणात 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत विभागांचे संकेतस्थळ अपडेट करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, व्हॉट्सॲप चॅटबोट, जनतेच्या तक्रारींचे नियोजन, कार्यालयातील सोयीसुविधा, स्वच्छता, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा व सुरू असलेले प्रकल्प, गुड गव्हर्नन्स आदींचे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलिस विभाग तर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर महानगर पालिकेबाबत सादरीकरण केले.

100 दिवस कृती आराखड्याच जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्र डॉ. अशोक उईके

व्हीसीद्वारे जिल्हा प्रशासनाचा आढावा ; पालकसचिवांची उपस्थिती

रिपोर्टर  :- नरसिंग बोल्लम उपसंपादक रीड पब्लिक न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 24 : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यात सुरवातीच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून मुख्यालय स्तरावर याबाबतचा आढावा नियमितपणे होणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात अग्रेसर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केल्या.

दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये, शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासकीय अधिका-यांनी शासकीय दौरे करतांना त्या ठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांना भेट देणे आणि शासकीय कार्यालयात येणा-या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचे आणि फिल्ड व्हिजीटचे वेळापत्रक तयार करावे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात.

शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक आहे. 15 एप्रिल 2025 च्या आत कृती आराखड्यानुसार दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल, याची दक्षता घ्यावी. यात कोणतीही हयगय होता कामा नये. शासन स्तरावर 100 दिवस कृती आराखड्याचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे, त्यामुळे अधिका-यांनी उद्दिष्ट ठेवून काम करावे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवावा. तसेच पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत ठेवावे. त्याची नियमित साफसफाई होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा इतर राज्यांना लागून असल्यामुळे अवैध वाहतूक, गो-तस्करी या बाबींना आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने कडक पाऊले उचलावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

लोकाभिमुख होऊन काम करा – पालकसचिव संतोषकुमार

राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची जिल्हा पातळीवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. शासन हे लोकाभिमुख असावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख होण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडविणे, आठवड्यातून दोन वेळा फिल्ड व्हिजीट करणे, गावात गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणे, आदी बाबी करणे आवश्यक आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात चांगले प्रशासन चालवावे. येत्या 100 दिवसात चंद्रपूर जिल्हा प्रशासन नक्कीच चांगले काम करेल, अशी अपेक्षा अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोषकुमार यांनी व्यक्त केली.

 

जिल्हाधिका-यांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी सादरीकरणात 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत विभागांचे संकेतस्थळ अपडेट करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, व्हॉट्सॲप चॅटबोट, जनतेच्या तक्रारींचे नियोजन, कार्यालयातील सोयीसुविधा, स्वच्छता, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा व सुरू असलेले प्रकल्प, गुड गव्हर्नन्स आदींचे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलिस विभाग तर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर महानगर पालिकेबाबत सादरीकरण केले.

००००००

Previous article
Next article
सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक – जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर, दि. 25 : निवडणूक हा लोकशाहीचा पाया असून मतदान करणे हा आपला सर्वोच्च अधिकार व कर्तव्य आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विकासाला चालना व गती प्राप्त होते. त्यामुळे देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे गरजेचे आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक असल्याचे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले. नियोजन भवन येथे 15 व्या “राष्ट्रीय मतदार दिनाच्या” कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) संजय पवार, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, तहसिलदार विजय पवार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच नवमतदारांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, देशाच्या लोकशाहीचा केंद्रबिंदू असणाऱ्या मतदारांसाठी “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात येत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदारांनी जागृत राहून मतदान करावे. जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी, लोकशाही आणि देश पुढे नेण्यासाठी प्रत्येक मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. आता नवमतदारांना वर्षातून चार वेळा ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे आणि लोकशाहीतील आपला सर्वात महत्वाचा असा मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्री.गौडा यांनी केले. प्रास्ताविकेत बोलतांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी म्हणाले, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. सन 2011 पासून संपुर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. मतदार विशेषत: युवा मतदारामध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदार यादीत नाव नोंदविण्याकरीता प्रोत्साहित करणे, त्यांची नाव नोंदणी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मतदार दिवसाची थीम “Nothing like voting, I vote for sure” अशी आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. चौधरी म्हणाले. तत्पुर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सपना पिंपळकर तर आभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांनी मानले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षक व बीएलओंचा सत्कार : 2024 निवड

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular