ACB च्या जाळ्यात ग्रामसेवक व महिला सरपंच
चंद्रपुर/महाराष्ट्र
दिनांक:- ६ मार्च २०२५
रिपोर्टर:- नर्सिंग बोल्लम उपसंपादक रिड पब्लिक न्यूज़ नेटवर्क
सविस्तर बातमी :-जिल्ह्यातील अजयपूर ग्रामपंचायत चंद्रपूर येथील ग्रामपंचायत अधिकारी विकास सुधाकर तेलमासरे यांनी ५ हजार रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने व सरपंच श्रीमती नलीनी दामोधर तलांडे यांनी १० हजार रूपये लाच रक्कम मागणी केली असल्याची तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांना प्राप्त झाली असल्याने यांचे पथकाने दिनांक ६ रोज गुरूवार ला ग्रामसेवकसह महीला सरपंच यांचेवर कार्यवाही केली असल्याची माहीती प्राप्त झाली.
याबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांनी मौजा अजयपूर येथे शेतजमीन खरेदी केलेली आहे. तक्रारदार यांना सदर शेतजमीनीचे फेरफार ग्रामपंचायत येथील नोंद करणेकरिता आणि सदर शेतजमीनीवर कुकुटपालनाचा व्यवसाय करणेकरीता नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे तक्रारदार यांनी दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत अजयपूर येथे रितसर कागदपत्रे सादर केली होती. दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या आमसभेमध्ये तक्रारदार यांचा फेरफारचा विषय ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी आमसभेच्या दिवशी इलोसे क्र.२ सरपंच श्रीमती नलीनी तलांडे यांनी तक्रारदार यांना १० हजार रुपयाची लाच रक्कमेची मागणी केली. त्यानंतर त्याचदिवशी आलोसे क्र. १ ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विकास तेलमासरे यांनी सुध्दा तकारदार यांना फेरफार ग्रामपंचायतीमध्ये नोंद करणेकरीता व कुकुटपालन व्यवसायाकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरीता १० हजार मागणी केलेली होती.
पण तक्रारदार यांना आलोसे क. १ ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विकास तेलमासरे व इलोसे क्र. २ सरपंच श्रीमती नलीनी तलांडे यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन दिनांक ०१ मार्च २०२५ रोजी तक्रार दिली.
तक्रारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून दि. ०४ मार्च २०२५ व ०५ मार्च २०२५ रोजी आलोसे क.१ श्री. तेलमासरे यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी स्वतः करीता तडजोडीअंती ५ हजार व इलोसे क. २ यांचेकरीता १० हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.
यावेळी दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान इलोसे क. २ सरपंच श्रीमती नलीनी तलांडे यांनीसुध्दा पंचासमक्ष स्वतः करीता १० हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.
त्यावरून आज दि. ०६ मार्च २०२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे क.१ ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) श्री. तेलमासरे यांनी पंचायत समिती कार्यालय चंद्रपूर येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ ५ हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच इलोसे क्र.२ श्रीमती नलु तलांडे यांनी तक्रारदार यांचेकडून लाचरक्कम मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने इलोसे क. २ यांना सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपासकार्य सुरू असल्याची माहीत पण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी दिली
सदरची कार्यवाही दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुररंदे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पो. हवा. हिवराज नेवारे, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, चापोशी सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांचे आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.


