Thursday, April 16, 2026
HomeBreaking newsलाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली...

लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका

 लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका

 राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे

 
महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की “राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यास या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देऊ”
 
चंद्रपुर/महाराष्ट्र 
 
दि . ०४ डिसेंबर 2024
 
रिपोर्टर :- मुख्य संपादक रमाकांत यादव रीड पब्लिक न्यूज मिडिया नेटवर्क
 
सविस्तर बातमी :- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. या निवडणुकीत राज्यातील २८८ जागांपैकी ५० जागाही काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व त्यांच्या मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाहीत. तर महायुतीने तब्बल २३५ जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे. महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे. त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केलं आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २,१०० रुपये देऊ. राज्यात आता महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात २,१०० रुपये कधी येणार याची प्रतीक्षा आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular