Saturday, June 6, 2026
HomeBreaking newsमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तर्फे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तर्फे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तर्फे

३ फेब्रुवारीला ‘अभिष्टचिंतन सोहळा’ व ‘जनसेवक सन्मान सोहळा २०२६’

चंद्रपुर महाराष्ट्र 

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत 

दिनांक:- ३१ जनवरी २०२६

सविस्तर बातमी:-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ‘जनसेवक सन्मान सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा दिमाखदार सोहळा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मूल नगरीत पार पडणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर–गडचिरोली तसेच दोन्ही जिल्ह्यांतील तालुका शाखा पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच अभिष्टचिंतन सोहळा व जनसेवक सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक निलेश सोमाणी हे राहणार असून, मूल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐकताताई समर्थ या सहअध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याचे उद्घाटन प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर व सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बंडू रामटेके (वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर), आ. स्वप्निल मरस्कोले (विभागीय व्यवस्थापक, एफडीसीएम, आगर विभाग, बल्लारपूर), आ. मृदुला मोटे (तहसीलदार, मूल) आणि आ. संदीप दोडे (मुख्याधिकारी, नगर परिषद, मूल) उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थिती म्हणून प्रकाश देवतळे (प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघ), प्रा. महेश पानसे (राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई), आ. अनूपकुमार भागर्व (ज्येष्ठ संपादक तथा विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई) आणि आ. राकेशजी रत्नावर (उपाध्यक्ष, नगर परिषद, मूल) यांची उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान लोकशाही बळकट करण्यासाठी सातत्याने कार्य करणारे, समाजातील अन्याय व प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवणारे तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील सत्यनिष्ठ व निःस्वार्थ जनसेवकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘जनसेवक सन्मान सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा सोहळा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता
माता दुर्गा मंदिर सभागृह, चंद्रपूर रोड, मूल, जिल्हा चंद्रपूर येथे होणार असून, उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजकांनी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी सर्व मान्यवर, आमंत्रित, पदाधिकारी, पत्रकार बांधव व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून ‘अभिष्टचिंतन सोहळा’ व ‘जनसेवक सन्मान सोहळा २०२६’ची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular