दुर्गापूर ग्रामपंचायत उर्जानगरकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रपुर महाराष्ट्र
रिपोर्टर:- सचिन ढगें रिड पब्लिक न्यूज़ भारत
दिनांक:- २५ जनवरी २०२६
सविस्तर बातमी:- दुर्गापूर ग्रामपंचायत उर्जानगरच्या वतीने देशातील सर्व नागरिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या शुभेच्छा संदेशात सरपंच श्री. मंजुषा शेषराव येरगुडे, उपसरपंच श्री. अंकित मारोती चिकटे, सदस्य श्री. दिवाकर तुरक, सौ. सज्जु रंगारी, सौ. अनिषा ईरपाते तसेच युवराज वसखेडे ग्रामपंचायत सचिव दुर्गापूर यांचा समावेश आहे.
भारताचे संविधान आपल्याला समानता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाची शिकवण देते. या महान मूल्यांचा आदर राखत प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्माणात आपले योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे. तसेच दुर्गापूर ग्रामपंचायत उर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या या पावन पर्वावर सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


