Saturday, June 6, 2026
HomeBreaking newsप्रभाग १६ हिंदुस्तान लालपेठमधून कु. अक्षय ज्ञा. बोबडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात

प्रभाग १६ हिंदुस्तान लालपेठमधून कु. अक्षय ज्ञा. बोबडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात

प्रभाग १६ हिंदुस्तान लालपेठमधून कु. अक्षय ज्ञा. बोबडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात

चंद्रपुर महाराष्ट्र

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत

दिनांक:- ३१ दिसंबर २०२५

सविस्तर बातमी:-चंद्रपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधून कु. अक्षय ज्ञा. बोबडे अपक्ष उमेदवार मैदानात

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्तान लालपेठ येथून कु. अक्षय ज्ञा. बोबडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना थेट वाचा फोडण्याचा निर्धार करत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व युवकांच्या रोजगाराच्या संधी हे त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत. राजकीय पक्षांपासून दूर राहून सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जिंकणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे कु. अक्षय बोबडे यांनी सांगितले.
हिंदुस्तान लालपेठ परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुण नेतृत्वाला संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
अपक्ष उमेदवार म्हणून कु. अक्षय ज्ञा. बोबडे यांना प्रभाग क्रमांक १६ मधील मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular