Saturday, June 6, 2026
HomeBreaking newsबाबुपेठ प्रभाग 13 मध्ये वासू देशमुखांचे विराट शक्तीप्रदर्शन, निवडणूक चित्र बदलले

बाबुपेठ प्रभाग 13 मध्ये वासू देशमुखांचे विराट शक्तीप्रदर्शन, निवडणूक चित्र बदलले

बाबुपेठ प्रभाग 13 मध्ये वासू देशमुखांचे विराट शक्तीप्रदर्शन, निवडणूक चित्र बदलले

चंद्रपुर महाराष्ट्र 

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत 

दिनांक:- २९ दिसंबर २०२५

 सविस्तर बातमी:-चंद्रपूर बाबुपेठ प्रभाग क्रमांक 13 मध्ये निवडणूक लढत त्या क्षणी जवळपास एकतर्फी झाल्याचे चित्र दिसून आले, जेव्हा उभे सर्वसाधारण (ड) गटातून भारतीय जनता पार्टीचे तडफदार, अनुभवी आणि जमीनीवर काम करणारे नेते माननीय वासू भाऊ देशमुख यांनी उमेदवारी अर्जासोबत जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीने प्रभागातील राजकीय वातावरण पूर्णतः बदलून टाकले.
दि. 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वासू देशमुख आपल्या निवासस्थानावरून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले. काही मिनिटांतच बाबुपेठच्या रस्त्यांवर भाजप कार्यकर्ते व समर्थकांचा जनसागर उसळला. गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि प्रभाग 13 मधील निवडणुकीची दिशा व दशा बदलल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
भाजप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या उमेदवारी रॅलीला बाबुपेठवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात रॅलीचे स्वागत झाले. उसळलेली गर्दी पाहता विरोधकांत अस्वस्थता स्पष्टपणे जाणवू लागली.
या वेळी दीपक खल्लारकर, सुधीर खल्लारकर, नरेश मंथनवार, अनिल धामणगे, गणेश आमटे, पुष्पा वंडेवार, आशु अक्केवार, प्रकाश खांडेकर, बालू राखुंडे, बंडू सिडाम, राजेश देशट्टीवार, दीपक नांदुरकर, मनोज गोरे, मुन्ना भाऊ उपाध्याय, सुरेश शिरसागर आणि विजय होकम या समर्पित भाजप कार्यकर्त्यांनी एकजुटीने रॅली यशस्वी केली.
“वासू भाऊ पुढे चला” आणि “वासू भाऊ आहे तर विश्वास आहे” अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण बाबुपेठ परिसर गाजून गेला. हे शक्तीप्रदर्शन केवळ संख्येपुरते मर्यादित न राहता, संघटनेची ताकद आणि जनतेचा विश्वास यांचे उघड प्रदर्शन ठरले.
या प्रसंगी वासू देशमुख यांनी ठाम शब्दांत सांगितले की बाबुपेठमध्ये आता ढिसाळ राजकारण चालणार नाही. विकास, मूलभूत सुविधा आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या निवडणुकीत जनता कमकुवत नव्हे, तर मजबूत आणि निर्णायक नेतृत्व निवडणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
या आक्रमक शक्तीप्रदर्शनानंतर बाबुपेठ प्रभाग 13 मधील निवडणूक चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, वासू देशमुख यांनी उमेदवारी अर्जासोबतच विरोधकांवर मानसिक आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular