Saturday, June 13, 2026
HomeBreaking newsतीवर्ला गावात अवैध जुगारधंदा सुरु, पोलिस प्रशासन मौन; स्थानिक सूत्रांचा दावा —...

तीवर्ला गावात अवैध जुगारधंदा सुरु, पोलिस प्रशासन मौन; स्थानिक सूत्रांचा दावा — कारवाई नाही तर आंदोलन

तीवर्ला गावात अवैध जुगारधंदा सुरु, पोलिस प्रशासन मौन; स्थानिक सूत्रांचा दावा — कारवाई नाही तर आंदोलन

चंद्रपुर/महाराष्ट्र 

दिनांक:-१८ सेप्टेंबर २०२५

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत मिडिया नेटवर्क 


सविस्तर बातमी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तीवर्ला गावात अवैध जुगारधंदा उघडपणे सुरू असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे. या अड्ड्याचा कारभार ‘अक्षय’ नावाने चालवला जात असल्याचा आरोप करण्यात येतो. सूत्रांनुसार, दररोज लाखो रुपयांचा व्यवहार येथे होतो आणि नागभीड, उमरेड, नागपूर, चिमूर आदी भागातून लोक मोठ्या प्रमाणात येथे येतात.

माहितीनुसार, जुगारामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात असून अनेक युवक व्यसनाधीन बनले आहेत. त्यामुळे कुटुंबांमध्ये कलह, भांडणं आणि चोरीसारखे गुन्हे वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुलांवरही याचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.

सूत्रांचा दावा आहे की वारंवार तक्रारी असूनही पोलीस प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. काहींचे मत आहे की स्थानिक पोलिसांकडून मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये रोष पसरला असून, उच्च प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तसेच, सूत्रांच्या माहितीनुसार, जर तातडीने अड्डा बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे.

या प्रकारामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष पुढील कारवाईकडे लागले आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular