Sunday, June 21, 2026
HomeBreaking newsचंद्रपुर एंटी करप्शन ब्युरोच्या महिला अधिकाऱ्यांबाबत सोशल मीडियावर फिरणारी माहिती अफवा असल्याचं...

चंद्रपुर एंटी करप्शन ब्युरोच्या महिला अधिकाऱ्यांबाबत सोशल मीडियावर फिरणारी माहिती अफवा असल्याचं स्पष्ट. झूठ्या अफवांवर विश्वास ठेवू नका – चंद्रपूर पोलिसांचं स्पष्ट

चंद्रपुर एंटी करप्शन ब्युरोच्या महिला अधिकाऱ्यांबाबत सोशल मीडियावर फिरणारी माहिती अफवा असल्याचं स्पष्ट.

झूठ्या अफवांवर विश्वास ठेवू नका – चंद्रपूर पोलिसांचं स्पष्ट स्पष्टीकरण! 

चंद्रपुर महाराष्ट्र 

दिनांक:-१० जुलाई २०२५

रिपोर्टर:-रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ मिडिया नेटवर्क 

सविस्तर बातमी:-भद्रावती एंटी करप्शन ब्युरोच्या महिला अधिकाऱ्यांबाबत सोशल मीडियावर फिरणारी माहिती अफवा असल्याचं स्पष्ट.

चंद्रपूर शहरात सध्या सोशल मीडियावर आणि काही माध्यमांवर “भद्रावती एंटी करप्शन ब्युरोच्या बनावट महिला अधिकारी” सरकारी कार्यालयात जाऊन पैसे उकळत असल्याची एक बातमी जोरात पसरली होती. मात्र या प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे.

चंद्रपूर अँटी करप्शन विभागाचे अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट सांगितले की,
“सदर महिलांविषयीची बातमी पूर्णपणे तर्कहीन आणि निराधार आहे. आमच्या खात्याकडून अशा कोणत्याही महिला अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली नाही. ही एक अफवा असून, नागरिकांनी अशा भ्रामक माहितीवर विश्वास ठेवू नये.”

कोणताही अधिकृत पुरावा नसताना या प्रकाराचा उल्लेख करून सोशल मीडियावर संभ्रम निर्माण केला जात आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

चंद्रपूर पोलीस व अँटी करप्शन विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की –

  • अफवांपासून दूर राहा
  • कोणतीही शंका असल्यास स्थानिक पोलिसांशी संपर्क करा
  • कोणत्याही व्यक्तीने धमकी दिल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास तात्काळ तक्रार दाखल करा

“चुकीची माहिती पसरवणे हे कायद्याच्या चौकटीत गुन्हा आहे.”
तरी सर्व नागरिक, कर्मचारी आणि मीडिया प्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खरी तपास यंत्रणा कधीच कोणालाही धमकावत नाही आणि पैशांची मागणी करत नाही.
सतर्क राहा, सजग राहा आणि अशा अफवांना थारा देऊ नका.

चंद्रपूर पोलीस प्रशासन
– आपल्या शहराची सुरक्षा, आमचं सर्वोच्च कर्तव्य!

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular