Friday, June 19, 2026
HomeBreaking news चंद्रपुर नवेगाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुजाता महिला मंडळातर्फे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ...

 चंद्रपुर नवेगाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुजाता महिला मंडळातर्फे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रिपोर्टर:- नर्सिंग बोल्लम रिड पब्लिक न्यूज़ मिडिया नेटवर्क

 चंद्रपुर नवेगाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुजाता महिला मंडळातर्फे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

रिपोर्टर:- नर्सिंग बोल्लम रिड पब्लिक न्यूज़ मिडिया नेटवर्क

दिनांक:-१२/५/२०२५

चंद्रपुर:- महाराष्ट्र

सविस्तर बातमी:-नवेगाव येथे सुजाता महिला मंडळ व समस्त ग्रामस्थ नवेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त एक भावस्पर्शी सुगम सांगित कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नरेशजी ताकसांडे (राजुरा) यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वनमाला सिद्धार्थ कातकर होत्या. उद्घाटक म्हणून धनराज निरंजने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून कथाडे साहेब (बिट जमादार, पोलीस स्टेशन गडचांदूर) आणि सुरणार साहेब यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात मडावी सर (भोयेगाव जिल्हा परिषद शिक्षक) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. मंचावर माजी पोलीस पाटील आक्केवार साहेब, प्रभाकर दुबे (ज्येष्ठ समाजसेवक), आणि लतिका नगराळे (अंगणवाडी सेविका) यांचीही मान्यवर उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाशजी पाझारे (युवा नेतृत्व) यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन बबन पेंदोर यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजक बबन पेंदोर,सिद्धार्थ कातकर,सुजाता महिला मंडळ, नवेगाव,व समस्त ग्रामस्थ नवेगाव या कार्यक्रमात ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आणि बुद्धाच्या शिकवणुकींचा जागर करण्यात आला. सुजाता महिला मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular