Monday, April 20, 2026
HomeBreaking news1 लाखावर आहे थकबाकी? मग नावे होणार सार्वजनिक त्वरीत भरणा करण्याचा मनपाचा...

1 लाखावर आहे थकबाकी? मग नावे होणार सार्वजनिक त्वरीत भरणा करण्याचा मनपाचा इशारा

1 लाखावर आहे थकबाकी? मग नावे होणार सार्वजनिक
त्वरीत भरणा करण्याचा मनपाचा इशारा

रिपोर्टर:- नरसिंग बोल्लम रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क

चंद्रपूर 03 मार्च – 1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे 8 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असुन 8 मार्चपर्यंत करभरणा न केल्यास 10 मार्च रोजी अश्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली जाणार आहेत.
शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाने थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे.
1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा केला जात आहे.त्यांना यासाठी 8 मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली आहे.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे विविध माध्यमातुन प्रसिद्ध केली जाणार आहे. नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेची कल्पना झाली आहे ते थकीतदार ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा करताना दिसत आहेत.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular