Monday, April 20, 2026
HomeBreaking newsवानिशा/दौरा कार्यक्रम / वाहतुक अधिसुचना /२५-127 चंद्रपूर, दिनांक:- १५/०२/२०२५.

वानिशा/दौरा कार्यक्रम / वाहतुक अधिसुचना /२५-127 चंद्रपूर, दिनांक:- १५/०२/२०२५.

वानिशा/दौरा कार्यक्रम / वाहतुक अधिसुचना /२५-127 चंद्रपूर, दिनांक:- १५/०२/२०२५.

रिपोर्टर:- नरसिंग बोल्लम रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क

दि.१६/०२/२०२५ रोजी मा. ना. श्री. देवेंद्र फडणविस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा चंद्रपुर येथील प्रियदर्शिनी हॉल येथे दौरा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाकरीता नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सदर कार्यक्रम दरम्यान उपस्थित अरणाऱ्या मान्यवर व इतर नागरीकांची वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या मार्गावरुन आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन वाहतुकीला अडथळा होवु नये म्हणुन या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशिर अधिकारान्चये, आम्ही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर असे निर्देशीत करतो की, सदर दौरा कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करणेबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात येत आहे.

दिनांक १६/०२/२०२५ रोजी सकाळी ०७:०० ते दुपारी १५:०० वा. पर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारचे वाहनाकरीता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हे नो पार्कंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

या कालावधीत सर्व वाहतुक दारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१) सदरच्या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका-उड्डान पुल-सिध्दार्थ हॉटेल-बस

स्टॅड-प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक-संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.

२) सदरच्या कालावधीत शहरातुन बाहेर जाण्यासाठी नागरीकांनी जटपुरा गेट-प्रियदर्शीनी चौक-बस स्टॅण्ड चौक-सिध्दार्थ हॉटेल-उडान पुल-वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक-मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.

३) सदर अधिसुचनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.

नागरीकांनी सदर अधिसुचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

(मुम्मका सुदर्शन, भापोसे) पोलीस अधीक्षक, चंद्रपुर

१) जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर आपण सदरहु अधिसुचना स्थानिक वर्तमानपत्रांतून प्रसिध्दीसाठी दयावी, हि विनंती.

२) उप. वि.पो. अधिकारी, चंद्रपुर/पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर/रामनगर/चंद्रपूर शहर यांना माहितीस व आवश्यक कार्यवाहीस.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular