Sunday, April 19, 2026
HomeBreaking newsदरोडा करण्याचा कट रचनारे आरोपी पोलीसांचे जाळयात रिपोर्टर :- नरसिंग बोल्लम...

दरोडा करण्याचा कट रचनारे आरोपी पोलीसांचे जाळयात रिपोर्टर :- नरसिंग बोल्लम संपादक रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क 

दरोडा करण्याचा कट रचनारे आरोपी पोलीसांचे जाळयात

रिपोर्टर :- नरसिंग बोल्लम संपादक रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क

फिर्यादी नामे पोउपनी संदीप बच्छीरे, मा. पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके मॅडम पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर पोस्टाफ सह, पोस्टे हददीत कोंबींग ऑपरेशन राबवीणे करीता रवाना होवुन पेट्रॉलींग करीत असताना, काही इसम राजीव गांधी इंजीनीअरींग कालेज समोरील उदयानात एटीएम फोडुन चोरी करण्याचा कट रचीत बसले आहे अशी माहीती मिळल्याने सदरच्या गुन्हयाचे गार्भीय लक्षात घेता पोनी श्रीमती प्रभावती एकुरके मॅडम व पोस्टाफ लागलीच पंचासहीत घटनास्थळी पोहोचले असता तेथुन तीन इसम पळुण गेले. पोस्टाफ ने पाठलाग करूण दोन इसमांना पकडुन त्यांची नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपली नाव १) सत्यबीर अनयसींग सिंग वय २१ वर्ष जात-ठाकुर, धंदा मजुरी, रा. इब्राहीमपुर, जि. फतेहपुर राज्य उत्तर प्रदेश २) दिपांशु राजकरण पटेल वय १९ वर्ष जात- पटेल, धंदा-मजुरी रा. बलीयार पुर, जि. बांधा राज्य -उत्तर प्रदेश असे सांगीतली. त्यांचे कडुन गुन्हा करताना वापरले जाणारे साहीत्य जप्त करूण त्यांचे विरूदध पोस्टे अप क १०३/२५ कलम ३१० (४) अन्वये गुन्हा नोंद करूण तपासात घेतला असुन सदर गुन्हयात दोन आरोपी अटक करण्यात आले आहे. गुन्हयातील अटक आरोपींना अधीक विचारपुस केली असता त्यांनी आदीलाबाद, करीमनगर, मध्य प्रदेश, भद्रावती (चंद्रपुर) येथे एटीएम मध्ये चोरी केल्याची कबुली दिली असुन अधीक तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री. सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर, श्री. संदीप बच्छीरे पोउपनि, पोहवा/सचिन बोरकर, पोहवा/संतोषकुमार कणकम, मपोहवा / भावाना रामटेके, नापोका/कपुरचंद खरवार, पोशि/इम्रान खान, पोशि/दिलीप कुसराम, पोशि/रूपेश रणदिवे, पोशि/राहुल चितोडे, विकम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.

सदर गुन्हयाचे पुढील तपास पोउपनी दत्तात्रय कोलटे करीत आहेत.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular