Sunday, April 19, 2026
HomeBreaking newsहिराई महोत्सवात डायग्नोस्टीक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिम

हिराई महोत्सवात डायग्नोस्टीक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिम

हिराई महोत्सवात डायग्नोस्टीक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिम

आरोग्य विभागाचा उपक्रम

चंद्रपूर, दि.१०: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान व जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त ‍विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत चांदा क्लब ग्राउंड येथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवात

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारे स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग या आजाराकरिता डॉयग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन च्या माध्यमातून स्तन कर्करोग, गर्भाशय, मूख कर्करोग, मौखिक कर्करोग आरोग्य तपासणी करण्यात आली.

स्त्रीरोग तंज्ञाकडून स्तन कॅन्सर करिता एकूण १४१ clinical Brest Examination तपसणी तसेच गर्भाशय मुख कर्करोग करिता संशयित महिलांची VIA तपासणी करण्यात आली. दंत शल्य चिकित्सक यांनी १८० महिलांची मुख कर्करोग करिता तपासणी केली.

सदर तपासणी शिबिराकरिता अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर तसेच अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. पद्माजा बोरकर, चंद्रपूर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Previous article
तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 203 भाविक बौध्दगया येथे रवाना Ø सामाजिक न्याय विभागाचे आयोजन चंद्रपूर, दि 06 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत दि. 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण 203 पात्र लाभार्थी महाबोधी मंदीर (बौद्धगया) येथे जाण्यासाठी बुधवारी रेल्वेने रवाना झाले. या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्यावतीने 5 फेब्रुवारी रोजी बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील 203 भाविकांना घेऊन भारत गौरव पर्यटन रेल्वे, चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरून सायंकाळी 5 वाजता रवाना झाली. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. तत्पुर्वी सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे, संवर्ग अधिकारी संगिता भांगरे आदींनी भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नागपूर येथील समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सदर यात्रेचा शुभारंभ केला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्हीडीओद्वारे सर्व भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. दि. 7 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे. 7 फेब्रुवारीला रात्री सदर रेल्वे बौद्धगया येथून परतणार असून 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सदर ट्रेन चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्यातील सर्वधर्मातील 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Next article

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular