Saturday, April 18, 2026
HomeBreaking newsनिलेश ठरला आमदार श्रीचा मानकरी* आ.जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित विदर्भस्तरीय बॉडी...

निलेश ठरला आमदार श्रीचा मानकरी* आ.जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न

 


 

 

 

निलेश ठरला आमदार श्रीचा मानकरी

 

आ.जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न

चंद्रपुर

दिनांक:- १९ जनवरी २०२५

रिपोर्टर:- नरसिंग बोल्लम

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या पटांगणावर आयोजित विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागपूरचा निलेश जोगी आमदार श्री २०२५ चा मानकरी ठरला ठरला आहे. तर चंद्रपूरचा आशिष बिरिया बेस्ट पोझर आणि अकोल्याचा अहमद खान यांनी बेस्ट इम्प्रुव्ह विजेतेपद पटकावले आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार किशोर जोरगेवार आणि मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली आहेत.

यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भारतीय जनता पार्टीचे नेते दशरथ ठाकुर, राजेंद्र अडपेवार, तुषार सोम, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, प्रकाश देवतळे, भाजप नेते खुशाल बोंडे, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदिप किरणे, शिला चौव्हाण, श्याम धोपटे, अमोल शेंडे, नकुल वासमवार, रशिद हुसेन, सलीम शेख, ताहीर हुसेन,करणसिंग बैस, सुमित बेले, हर्षद कानमपल्लीवार, राम जंगम, असोशिएशनचे सचिव सुभाष लांजकेर, कोष्याध्यक्ष विवेक भुरटकर, सदस्य गणेश रामगुंडेवार आदींची मंचावर उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान शनिवारी गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने तथा चंद्रपूर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75 आणि खुल्या अशा सहा वजनगटांत घेण्यात आली होती. यात चंद्रपूरसह नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यांतील 142 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी सहा वाजता 55 वजन गटाच्या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 55 वजन गटात चंद्रपूरचा आशिष बिरिया, 60 वजन गटात बुलढाण्याचा दत्तात्रेय सावरकर, 65 वजन गटात अकोल्याचा संदीपसिंग ठाकुर, 70 वजन गटात अकोल्याचा सोहेब अहमद, 75 वजन गटात अकोल्याचा सोहेब साहिल यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. तर या स्पर्धेत आमदार श्रीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नागपूरच्या निलेश जोगीने बाजी मारत पहिल्या क्रमांकासाठी असलेले 55,555 रुपयांचे पारितोषिक जिंकत आमदार श्री 2025 चा मान पटकावला. तसेच बेस्ट पोझर म्हणून आशिष बिरियाला 33,333 रुपये आणि शिल्ड, बेस्ट इम्प्रुव्हमेंटसाठी अहमद खान याला 22,222 रुपयांचे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बॉडी बिल्डिंग ही केवळ शरीराचा व्यायाम नाही, तर मनाच्या शिस्तीचा, मेहनतीचा आणि दृढ संकल्पाचा सर्वोच्च नमुना आहे. आपल्या समाजातील तरुणांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आजच्या युगात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. फिटनेस आणि व्यायामाच्या माध्यमातून केवळ शरीर सुदृढ होत नाही, तर मन आणि आत्माही उन्नत होतो. युवक व्यसनापासून दूर राहतो, आपल्यातील प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात व्यायामाला प्राधान्य दिलं पाहिजे. पुढे पण असे आयोजन आपण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांनी स्पर्धकांना कसरत करण्याचे आवश्यक सल्ले देत आयोजनाचे कौतुक केले. यावेळी अभिषेक कारिमवार, अविनाश लोखंडे, राजू कोटेवार, विशाल शिंदे, प्रतीम पाटील, गौतम शंभरकर, योगेश देवतळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Previous article
Next article
आदिवासी युवक-युवतीं व महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन चंद्रपूर, दि. 20 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 10 तालुक्यातील सुशिक्षित, होतकरु बेरोजगार, युवक-युवती व महिलांना रोजगार तसेच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध योजना, योजनेच्या अटी व शर्ती तसेच तांत्रिक बाबींवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर ऋतुराज सुर्या, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजु नंदनवार, पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य प्रबंधक कुमारील आदित्य, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक पंकज भैसारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपप्रबंधक विवेक येसेकर, इंडस्ट्रियल इंस्पेक्टर शालु घरत आदींची उपस्थिती होती. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनात प्रथमच स्वयंरोजगारांना मार्गदर्शन करण्यासाठी बँक प्रमुख व उद्योग केंद्रांना एकाच व्यासपीठावर आणत आदिवासी स्वयंरोजगारांना उद्योग उभारणीसाठी असणाऱ्या विविध संधीची माहिती देण्यात आली. यावेळी राचेलवार म्हणाले, मार्गदर्शन शिबिरातून आदिवासी समाजातील युवक-युवती व महिलांना विविध स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. उद्योग उभारणीतून स्वयंरोजगार निर्माण करण्याची प्रक्रिया एकांगी न राहता जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँक यांच्या सहभागातून सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व सुलभ पार पाडावी हा मुख्य हेतू आहे. आदिवासी सुशिक्षित बेरोजगार, तरुण-तरुणींना छोटे-मोठे उद्योग उभारतांना शासनस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच योजनांचा लाभ मिळण्यासाठी अवलंबविण्याची विहित पद्धती, योजनेसाठीची कागदपत्रे, तसेच सर्वतोपरी पाठपुरावा करण्यासाठी प्रकल्प कार्यालय स्वयंरोजगार, उद्योजक, जिल्हा उद्योग केंद्र व बँकांमध्ये मध्यस्थ राहील, असेही ते म्हणाले. जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर ऋतुराज सुर्या यांनी युवक-युवतींच्या स्वयंरोजगारास पुरक वातावरण तयार करून त्याद्वारे ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला जात आहे. यासाठी योजनेचा अटी, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प किंमत व अनुदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular