Monday, April 20, 2026
HomeBreaking newsC.T.P.S. येथील पाईप व तार चोरणारे जेरबंद

C.T.P.S. येथील पाईप व तार चोरणारे जेरबंद

C.T.P.S. येथील पाईप व तार चोरणारे जेरबंद
स्थानिक गेन्हे शाखा चंद्रपूर ची कारवाई
 
चंद्रपुर महाराष्ट्र 
 
दि ०२/०३/२०२५
 
रिपोर्टर:- नर्सिंग बोल्लम उपसंपादक रिड पब्लिक न्यूज़ मिडिया नेटवर्क 
 
 सविस्तर बातमी:-जिल्ह्यातील चोरींच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. चोरांनमुळे नागरिक हैराण झाले  घर फोडी, वाहन चोरी अशा चोरीचा घटनांवर योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. आता तर चोरट्यांनी (Ctps) येथील लोखंडी पाईप, तार यांचेवर लक्ष केले असून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली.
       की, कोसारा, दाताळा रोड वरील आठ ते दहा ईसम पाईप व लोखंडी तार घेऊन जात आहेत. सदर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला असता येत असलेल्या ईसमांना पोलिस असल्याचे लक्षात आले ‘ते’ सैरावैरा पळाले त्यापैकी तीन ईसम १) सूर्यभान तीम्मा धोत्रे, २) सुनिलमसु ईटकर, ३) रामू उंदरावर जाकनेकर यांना ताब्यात घेतले.
        या प्रसंगी ईसमांची कसुन विचारपूस केली तर ते पोपटा सारखे बोलायला लागले सदर माल “ctps या कंपनीतील, लोखंडी पाईप व तार आहे” “त्यांना विक्री करीता घेऊन जात आहे” फरार ईसमांनी तीन  दुचाकी घटनास्थळावर सोडून पसार झाले असता त्या ताब्यात घेत दुचाकीसह पाईप व ताराची २ लाख ५९ रूपयांचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली.
       याप्रकरणी आरोपींन कडून मिळून आलेला माल हा चोरी करून अथवा लबाडीने मिळवला असल्याचे कारणास्तव त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथील अदखलपात्र अप. क्र./ २०२५ कलम १२४ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
      सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पो.उपनिरीक्षक संपोष निंभोरकर, नापोअ संतोष येलपुलवार, पोअ नितीन रायपुरे, मिलिंद जांभुळे, गणेश भोयर, प्रमोद कोटनाके, दिनेश अराडे यांनी केली.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular