Sunday, April 19, 2026
HomeBreaking newsजिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या जन्मदिनी ५१ दात्यांनी केले रक्तदान

जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या जन्मदिनी ५१ दात्यांनी केले रक्तदान

जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या जन्मदिनी ५१ दात्यांनी केले रक्तदान

चंद्रपुर/महाराष्ट्र

दिनांक :- १२ फरवरी २०२५

रिपोर्टर :- उप संपादक नर्सिंग बोल्लम रीड पब्लिक न्यूज, नेटवर्क

सविस्तर बातमी:-राजुरा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. राम मंदिर राजुरा येथे आयोजित भव्य रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी युवक काँग्रेसच्या विविध शाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक चे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मला कुडमेथे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक गजानन भटारकर, शहराध्यक्ष संतोष गटलेवार,महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सभापती विकास देवाळकर, अँड. रामभाऊ देवईकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, अभिजित धोटे, कृ. उ. बा. स. संचालक तिरुपती इंदूरवार, जगदीश बुटले, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, वसंता ताजने, मंगेश गुरूनुले, पूनम गिरसावळे, मेघा धोटे, सुमित्राबाई कुचनकर, अर्चना गर्गेलवार, यु. काँ. विधानसभा अध्यक्ष उमेश गोणेलवार, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, आकाश मावलीकर, मधुकर झाडे, विक्रम ठाकूर, अशोक कांबळे, खुशाल लोनगाडगे, प्रशांत लोढे, सय्यद साबिर, निरंजन मंडल, अंकुश परेकर, श्रीधर रावला, श्रीकांत चिट्टलवार, दिपक वाभिटकर यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय रुग्णालय चंद्रपूर च्या रक्त संकलन विभागाचे वैद्यकीय अधिक्षक गणेश तुपेकर, तंत्रज्ञ प्रतिक मोटे, डॉ. मयूरी, डॉ. राधाकृष्ण, ब्रदर दुर्गादास यांनी सहकार्य केले.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular