Saturday, June 13, 2026
HomeBreaking newsचंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई, 10 आरोपींवर जुगार प्रकरणात गुन्हा दाखल

चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई, 10 आरोपींवर जुगार प्रकरणात गुन्हा दाखल

चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई, 10 आरोपींवर जुगार प्रकरणात गुन्हा दाखल

चंद्रपुर महाराष्ट्र 

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत मिडिया नेटवर्क 

चंद्रपूर, 16 ऑक्टोबर 2025:

सविस्तर बातमी :-पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीतील मौजा पिंपळगाव (भोसेले) येथे चंद्रपूर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 10 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

छाप्यामध्ये पोलिसांनी मिळवलेली रोकड रक्कम ₹25,900, दोन दुचाकी वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ₹1,56,650 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली असून, गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. आरोपी जुगार खेळत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

चंद्रपूर पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था राखली जाईल.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular