Saturday, June 13, 2026
HomeBreaking newsआज़ पत्रकारांचे ठिय्या आंदोलन ब्रेकिंग न्यूज :- पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश हिवसे...

आज़ पत्रकारांचे ठिय्या आंदोलन ब्रेकिंग न्यूज :- पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश हिवसे यांच्या विरोधात पत्रकारांचे ठिय्या आंदोलन

आज़ पत्रकारांचे ठिय्या आंदोलन

ब्रेकिंग न्यूज :- पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश हिवसे यांच्या विरोधात पत्रकारांचे ठिय्या आंदोलन

डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियम, २०२१ चे उल्लंघन आणि वर्दीचा दुरुपयोग केल्याच्या आरोपांवर कारवाईची मागणी

चंद्रपूर :-
पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश हिवसे यांनी पत्रकारांविरोधात केलेल्या कथित कारवायांविरोधात आणि डिजिटल मीडिया कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांवरून पत्रकार संघटनांकडून जोरदार आंदोलन छेडले जाणार आहे. इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन चंद्रपूर तर्फे उद्या, दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

माहितीनुसार, ठाणेदार हिवसे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना संरक्षण दिल्याचा आरोप आहे. तसेच एका पत्रकाराने अशा अवैध क्रियाकलापांविषयी बातमी केल्यानंतर त्याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात “भूमिपुत्राची हाक” या न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे यांच्यावर त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते.

पत्रकार संघटनांचे म्हणणे आहे की, भारतीय संविधानातील कलम 19(1)(अ) अंतर्गत पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 आणि पत्रकार सुरक्षा कायदा 2019 नुसार पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीही पत्रकारांनी अवैध धंद्यांविषयी बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून त्यांच्यावरच गुन्हा दाखल करणे हे पत्रकार स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

⚖️ कायद्यानुसार पोलीस थेट गुन्हा नोंदवू शकत नाहीत

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या माहिती तंत्रज्ञान (डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियमांनुसार, कोणत्याही न्यूज पोर्टल, इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल किंवा यूट्यूब पत्रकारावर बातम्यांच्या संदर्भात थेट गुन्हा नोंदविण्यापूर्वी ठराविक प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे.
प्रथम संबंधित संपादकाकडे तक्रार दाखल करावी लागते. संपादकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रकरण जिल्हा न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे अधिवक्ता यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या डिजिटल मीडिया मध्यस्थाकडे वर्ग केले जाते. त्यानंतरच पोलीस प्रशासन गुन्हा नोंदवायचा की नाही याचा निर्णय घेऊ शकते.

पत्रकार संघटनांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात ही कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही. परिणामी, माहिती तंत्रज्ञान नियम 2021 चे उल्लंघन झाले आहे आणि पत्रकारांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. अन्यथा, जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

उद्या होणाऱ्या या आंदोलनात जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे आंदोलन इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष अनुप यादव, संजय कन्नावार, राजू बिट्टूरवार, दिनेश एकोणकर तसेच इतर सर्व पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular