Sunday, June 14, 2026
HomeBreaking newsतैलिक समाजाच्या संघटनेत नवचैतन्य! रामजी हरणे यांची जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती

तैलिक समाजाच्या संघटनेत नवचैतन्य! रामजी हरणे यांची जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती

तैलिक समाजाच्या संघटनेत नवचैतन्य! रामजी हरणे यांची जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती

चंद्रपुर महाराष्ट्र 

दिनांक:- ५ अगस्त २०२५

रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत मिडिया नेटवर्क 

सविस्तर बातमी:- चंद्रपुर तैलिक समाजाच्या एकतेसाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या चंद्रपूर जिल्हा सहसचिवपदी रामजी हरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रामजी हरणे हे समाजकार्यात सक्रिय योगदान देणारे एक कर्तव्यदक्ष आणि जुझारू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक भान आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर महासभेने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीबाबत महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. प्रकाश देवतळेविभागीय अध्यक्ष मा. जगदीश वैद्यजिल्हाध्यक्ष अजय वैरागडेमहिला विभागीय कार्यवाह छायुताई वैरागडे, आणि युवा जिल्हा कार्याध्यक्ष आशिष देवतळे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

महासभेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवडीमुळे तैलिक समाज संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रामजी हरणे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की — “संघटनेने दाखवलेला विश्वास मी कधीच विसरणार नाही. समाजहितासाठी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करेन.”

“रीड पब्लिक न्यूज भारत” कडून रामजी हरणे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular