Sunday, April 19, 2026
HomeBreaking newsसराफा दुकानांतुन सोनं चोरून पसार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपुर शहर पोलीसांनी केले...

सराफा दुकानांतुन सोनं चोरून पसार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपुर शहर पोलीसांनी केले गजाआड

सराफा दुकानांतुन सोनं चोरून पसार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपुर शहर पोलीसांनी केले गजाआड

रिपोर्टर :- नरसिंग बोल्लम संपादक रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क

पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक १२/०२/२०२५ ला या एकाच दिवशी वेगवेगळ्‌या दोन सराफा दुकानात अरोपी हा सराफा दुाकान हरिओम ज्वेलर्स येथील सोन्याची अंगठी दाखवा असे म्हटल्यावरून यातील फिर्यादी यानी त्यांना अंगठीचा ट्रे दाखविला नंतर अंगठी हातात बघुन आरोपीने नंतर येतो, असे म्हणुन दुकानातुन निघुन गेला. काही वेळा नंतर ट्रे मधील एका अंगुठीचा बार कोड टेंग दिसुन आला नाही. बिना बारकोड असलेली सोन्याची अंगठी सोन्याचे दागीने चेक करणाऱ्या कसोटीवर घासुन चेक केले असता, ती सोन्याची नसल्याचे आढळून आले. फिर्यादीने सि.सी.टि.व्ही. फुटेज चेक केले असता, यातील आरोपी ईसम हा सोन्याची अंगठी काढून नकली सोन्याची अंगठी ठेवताना दिसत आहे. तरी ३.०४० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी कि. ३५,००० रू. ची सदर अरोपीने चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून अप.क्र. १०७/२०२५ कलम ३०३,३१८ (४) भारतीय न्यास संहिता अन्वये नोंद करण्यात आला. तसेच अशीच घटना टिकमचंद सराफ अॅन्ड ज्वेलर्स येथे सुध्दा घडली यातील फिर्यादीची ३.०१० ग्रॅम सोन्याची अंगठी किं. ३०,००० रू. यातील आरोपीने चोरून नेली. अशा रिपोर्ट वरून अप.क्र.:- १०८/२०२५ कलम ३०३,३१८ (४) भारतीय न्यास संहिता. अन्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

नमुद गुन्हा उघडकीस आणणे कामी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम व गुन्हे शोध पथकातील सर्व स्टॉफ नी अतीशय परिश्रम घेवुन अवघ्या २ तासात सराफा दुकानदाराची फसवणुक करणाऱ्या व त्यांना चकमा देउन सोनं चोरून पसार झालेला रेकार्डवरिल आरोपी नामे हम्झा अब्दुल वाहिद शेख, वय ३० वर्षे, धंदा मजुरी रा. अरविंद नगर वाई चंद्रपूर, यास काही तासातच अटक करण्यात आली व त्याचेकडुन १.अप.क.:- १०७/२०२५ कलम ३०३,३१८(४) भारतीय न्यास संहिता या गुन्ह्यातील ३.०४० ग्रॅम किंमत ३५,००० रु. ची व २) अप.क्र.:- १०८/२०२५ कलम ३०३,३१८ (४) भारतीय न्यास संहिता या गुन्हयातील ३.०१० ग्रॅम वजनाची किंमत ३०,००० रू. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी अॅक्टीवा क्र. एम. एच. ३४ झेड १५५८ किं. ४५,००० रू. व मोबाईल ओपो कंपणीचा किं. २०,००० रू. असा एकुण १,३०,००० रू. चा माल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अधि. Dy.SP. प्रमोद चौगुले, पो.नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, पोउपनि. संदिप बच्छीरे, पो.हवा. सचिन बोरकर, संतोष कनकम, म. पो. हवा. भावना रामटेके, नापोशि. कपुरचंद खरवार, पो.अं. इम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केलेली आहे

करीता सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, पो. स्टे. ला दाखल गुन्ह्यामध्ये सराफा मालकाने दुकानात सि.सि.टि.व्ही. फुटेज लावल्याने सदर फुटेजच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपीला पो.स्टे. चंद्रपुर पोलिसांनी काहि तासातच पकडन्यात यश आले. करीता जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी व सराफा दुकान मालकांनी आपले व आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले घरी, दुाकानामध्ये व आजुबाजुच्या संवेदनशिल ठिकाणी सिसीटिव्ही फुटेज बसविण्यात यावे. हि नम्र विनंती.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular